त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले धार्मिक केंद्र आहे. त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्र हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आद्य ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे.तसेच नाशिक शहरापासून २८ किलोमीटर अंतरावर असलेल्या त्रंबकेश्वर शहरात ज्योतिर्लिंगासह प्राचीन हिंदू मंदिर आहे,त्या बरोबरीनेच दर बारा वर्षाआड सिहास्थ महा कुंभ मेळा येथेच भरतो. येथे स्थित ज्योतिर्लिंगाचे विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे त्रिगुणात्मक स्वरुपात येथील देव दिसतात .ज्याला भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान महेश (शिव) यांचे मूर्त स्वरुप आहे. हे मंदिर आकर्षक आणि शिल्पकला म्हणून प्रसिद्ध आहे आणि गोदावरीच्या ताटावर व ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले हे गाव आहे.

ॐ त्र्य॑म्बकं यजामहे सु॒गन्धिं॑ पुष्टि॒वर्ध॑नम् । उ॒र्वा॒रु॒कमि॑व॒ बन्ध॑नान् मृ॒त्योर्मुक्षीय॒ मा ऽमृता॑त् ।

बारा ज्योतिर्लिंग

भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात.१२ ज्योतिर्लिंग खालील प्रमाणे आहे .
1. सोमनाथ (गुजरात - वेरावळ) 2. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य) 3. महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन) 4. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर) 5. वैजनाथ (महाराष्ट्र - परळी) 6. भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर) 7. रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर) 8. नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ) 9. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी) 10. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर) 11. केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ) 12. घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद)