नारायण नागबली कोणी करावी?

आपण प्रथम ‘नारायणबली’ म्हणजे काय याचा विचार करू. हा अतृप्त जीवात्म्याला गती देण्याकरता केला जातो.तसेच प्रापंचिक दृष्टीकोनातून येणाऱ्या अडचणींचा परिहार कसा होतो या संबंधी विचार करणे जरुरी आहे.कारण या विधीस सकाम नारायण बली अशी संज्ञा आहे.यात प्रथम मनाचा विचार केला पाहिजे.

आपले मन एवढे मोठे आहे कि त्यात आपण मागचे जन्मीचे विचार साठवले आहे. याही जन्मीचे विचार साठवत आहे.परंतु आपले मनाचे भोवती वासनेचे जाल आहेत.हे मन वासनेने गुरफटलेले आहे.आता सर्वच्या सर्वच वासना तृप्त होतात असे नाही. काही तीव्रतर वासना मरेपर्यंत शिल्लक राहता.ज्यावेळी तीव्रतर वासना शिल्लक राहून मृत्यू येतो,त्यावेळी तो जीवात्मा पृथ्वीतलावरच हिंडायला लागतो .म्हणजे तो दुर्गतीस गेला असे मानले जाते.

या विधी मध्ये त्या जीवात्म्याचा मूळ वासनेचाच क्षय केला जातो.वासनेचा क्षय झाल्याने तो ऊर्ध्व गतीला जातो.तो ऊर्ध्व गतीला गेल्यानंतर अदृश्य शक्तीपासून होणारा त्रास हा आपोआपच कमी होतो व तो जीवात्मा त्यास गती दिल्याने आशीर्वाद देवूनच वरती जातो.या तत्वावर ‘नारायणबली’ हा विधी आधारला आहे

नारायण नागबली श्राद्ध मंत्र

“पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यं नेच्छन्ति मानवा: । न पाफलमिच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नत: ।। “

देशनिर्णय

हा विधी श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर येथेच फक्त केला जातो. आज हजारो वर्षांची परंपरा व शास्त्रप्रमाण या दोन्ही गोष्टी मुळेच येथे ह विधी करतात.

उपायांची यथार्तता

हा विधी येथेच करण्याची अविच्छिन्न परंपरा आहे. हा विधी प्रामुख्याने अनपत्यता दूर होऊन संततिसौख्य लाभावे म्हणुन केला जातो. या करिता पतिपत्नी यांच्या शरीरातील दोष हे संतती न होण्यास एक दुष्ट कारण आहे. ज्योतिषशास्त्रानेहि व आयुर्वेदानेहि प्रेतशाप, पितृशाप, नागबधजन्य दोष यापासून होणाऱ्या पीडेपासून व पीडा देणाऱ्या जीवात्म्यास गति मिळावी म्हणून नारायण नागबली हाच विधी करावा असे सांगितले आहे; ही गोष्ट निश्चित आहे.

मुहुर्त विचार

या कर्मास धनिष्ठपंचक व त्रिपाद नक्षत्रे वर्ज्य आहेत. धनिष्ठापंचक म्हणजे धनिष्ठा नक्षत्राचे उत्तरार्धांस आरंभ करुन रेवतीचे अंतापर्यन्त या साडेचार नक्षत्रास धनिष्ठा पंचक म्हणतात. त्रिपाद नक्षत्रे कृतिका, पुनर्वसु, उत्तराफाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा व पुर्वाभाद्रपदा ही नक्षत्रे वर्ज्य होत.

उत्तम दिवस व नक्षत्रे

रविवार, गुरुवार, सोमवार हे चार प्रारंभास उत्तम समजावेत. अश्विनी, पुष्य, हस्त, स्वाति व श्रवण ही चार नक्षत्रे आरंभास उत्तम होत. नारायण नागबली कर्माचे अधिकारी :- हा विधी सर्व वर्णीयास करण्याचा अधिकार आहे. ज्याचे आई-वडील जिवंत आहेत त्यांनाही करता येतो. ब्राह्मणास मौजीबंधनानंतर ब्रह्मचर्यावस्थेत करता येतो. संततीकरता प्रमुख्याने हा विधी असल्याने सपत्नीकास करता येतो. पत्नी नसताना कुलाचे उद्धाराकरिता करता येतो. स्त्री गर्भिणी असता ७ व्या महिन्यापर्यंत करता येतो.

स्थळ

शास्त्रकारांनी हा विधी दोन नद्यांच्या संगमावर अश्वत्थ वृक्ष सान्निध्यात व महा स्मशानभूमीत करावा असे सांगितले आहे. त्र्यंबकेश्वरी हा विधी ज्या स्थळी केला जातो, ती जागा त्र्यंबकेश्वर मंदीराच्या पूर्व बाजूस आहे. फार पुरातन काळापासून हा विधी त्याच स्थळी करतात. ही जागा त्र्यंबकेश्वर मंदीराच्या पूर्व बाजूस देवळापासून १००-१५० फुट अंतरावर आहे.

धार्मिक खर्च

नारायण नागबली हे सकाम कर्म आहे असे मागे सांगितले आहे. सकाम कर्मास प्रत्येकाने आपले बारा महिन्याचे जे उत्पन्न असेल त्याचा दहावा भाग खर्च कर्वा असा सर्वसाधारण नियम आहे.

पूर्व तयारी

हा विधी कोऱ्या वस्त्रावर करावा लागतो. त्याकरिता एक धोतर-जोडी व पत्नीस पांढरे पातळ व चोळी लागते. ते स्वच्छ धुवून वाळत टाकावे म्हणजे विधीस जातना तीच वस्त्रे नेसून जावे लागते. हा विधी नारायण हेजे विष्णूचे नांव आहे त्या नावाने केला जातो. नारायणबली शब्दाची व्युत्पत्ति नारायण या शब्दाचा अर्थ `नारस्य मुक्ते अयनं प्राप्तियंस्मात' ज्ञान किंवा मुक्ती देणारा यास नारायण म्हणतात, येथेहि प्रेतभूमीतून मुक्तीच अभिप्रेत आहे. म्हणून या विधीस नारायणबली हे नांव देण्यात आले आहे.

नारायणबली विधी : हा विधी तीन दिवसाचा असतो

पहिला दिवस

पाच कलशावर पूर्ण पात्रांची स्थापना व कलशपूजन करावे. त्या पांच कलशावर या विधीच्या ज्या प्रमुख पाच देवता ( विष्णूची मूर्ती सोन्याची, रुद्राची तांब्याची, ब्रह्मदेवाची रुप्याची यमाची लोहाची, प्रेताची दर्भाची ) आहेत. त्याची प्राणप्रतिष्ठा करून षोडशोपचारे पूजन करावे व मुख्य देवतेस उद्देशून ( भाताचा चरु किंवा कणकेच्या ) १६ आहूती द्याव्या नंतर स्विष्टकृत होम व प्रायश्चित्य होम करावा. अग्निपूजन करून होमाची पूर्तता करावी. विष्णू बलीच्या अंगभूत विष्णूश्राद्ध ( प्रेतास विष्णूरूप मानून) व पाच देवतांना उद्देशून पिडदान करावे. ( हे पिंडदान दक्षिणेस तोंड करून करावे. पत्नीने लांब बसावे. ) विष्णूश्राद्धांत १० व पंचदेवतास ५ असे एकूण १५ पिंड द्यावेत. ( आपल्या सूत्राप्रमाणे पिंडदान करावे) पहिल्या १० पिंडास विष्णूश्राद्ध असे म्हणतात. विष्णूश्राद्धाचे १० पिंडावर प्रत्येकी गोप्रदान द्यावे असे सांगितले आहे. नंतर दुसरा पिंड द्यावा यास विष्णूश्राद्ध म्हणतात. यावर गाय व बैल याचे लग्न लावून त्याचे दान करावे असे सांगितले आहे. नंतर ४ था पिंड यमास उद्देशून द्यावा, यास यमश्राद्ध म्हणतात. या श्राद्धावर दुभती म्हैस असते. तिचे दान द्यावे असे सांगितले आहे. नंतर ५ वा पिंड द्यावा, तो प्रेतास उद्देशून असतो. त्यावर १३ मण तिळाचे दान द्यावे असे सांगितले आहे. नंतर सर्व पिंडाचे समंत्रक पूजन करून विसर्जन करावे. ( वर सांगितल्याप्रमाणे या विधीत जो दाने द्यावयास सांगितली आहेत, ती सर्व देण्यास सक्ती नसते. ) म्हणून आपण जे पैसे एकूण धार्मिक खर्चाकरिता देण्याचे ठरविले असेल त्यातूनच `यथाशक्ति यथाशेन' म्हणजे मी माझ्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे ही दाने देत आहे. असा याचा अर्थ आहे. ( प्रत्येक दानाचे वेळी हीच व्यवस्था समजावी )

बलिप्रदान

एका पत्रावळीवर शिजविलेला भात बुरुजाच्या आकाराचा करून ठेवावा; व त्यावर एक काकडा पेटवून ठेवावा. त्याचे समोर यजमान पतीपत्नीने बसावे. प्रेतास उत्तम गति मिळावी म्हणून हे बलिप्रदान करावयाचे असते.

पालाशविधी

प्रथम मनुष्याच्या आकृतीकरिता ** पळसाच्या ३६० काड्या घेऊन त्या दोरीने बांधाव्या. मस्तकाचे ठिकाणी नारळ ठेऊन त्या काड्यावर व नारळावर कणकीचा गोळा ठेवून मनुष्याची आकृती तयार करावी. आपणास पीडा देणारा वा ज्यास गति मिळाली नाही त्या जीवात्म्याचा तो देह आहे असे कल्पून नारायण हे नांव घेऊन व त्याचे गोत्र काश्यप आहे असे धरून त्याच्या अंत्यविधीस सुरवात करावी. यास पालाशविधी किंवा पर्णशर असे म्हणतात.

दुसरे दिवशी

दुसरे दिवशी स्नाने आटोपल्यावर तीच धौत वस्त्रे नेसून गंगेच्या पाण्याचा तांब्या भरून पळी, भांडे, ताम्हण घेऊन त्र्यंबकेश्वराच्या देवळात जावे. तेथे त्र्यंबकेश्वरची प्रार्थना करून पूर्व दरवाजाने हा विधी जेथे होतो त्या धर्मशाळेत उभयतांनी गावे, म्हणजे अग्नामहिदोदिष्ट या कर्मास प्रारंभ करावयाचा.

मासिक श्राद्ध

बारा महिन्यापर्यंतची जी एकंदर सोळा श्राद्धे करावि लागतात ती गव्हाचे पिठाचे पिंड देऊन करतात.

सपिंडि श्राद्ध

याचा अर्थ प्रेतयोनीतील असलेला म्हणूनच आपणास पीडादेणारा जो जीवात्मा त्यास पितरादि उत्तम लोकांस पाठविणे आपणास पीडा देणाऱ्याचे नाव वगैरे माहित नसल्याने, त्याच्या पितरांची नांवे ब्रह्मा, विष्णू, रुद्र अशी नांवे घेऊन हे श्राद्ध केले जाते. चटरुपी ब्राह्मण कल्पून हे श्राद्ध करावे.

पाथेय श्राद्ध

प्रेत लोकांतून पितृलोकांत जाण्याकरिता म्हणून शिदोरीप्रमाणे त्या जीवात्म्यास उद्देशून पिंडदान करतात. म्हणून यास पाथेय श्राद्ध असे म्हणतात. हे श्राद्ध कणकीचे तीन पिंड देऊन करतात. नंतर सर्व पिंडाचे पूजन करुन यम्य स्मृत्या करून म्हणजे कर्म ईश्वरार्पण करतात. या विधीस सकाम नारायणबली पालाशविधीयुक्त ( मोक्ष देणारा ) असे म्हणतात. निर्णयसिंधुकारांनी सकाम नारायणबली म्हणून याचा उल्लेख केला आहे. या विधीने प्रेताची शुद्धी होते व पालाश विधीने प्रेतयोनीतून जीवात्मा मोक्षास जातो, अशा रीतीने अनपत्यता, दुर्धर शरीरपी वगैरे दोष नाहीसे होतात.

नागबली विधी

नागबली हा विधी नारायणबली पूर्ण झाल्यानंतर लगेच सुरू करतात. हा विधी त्र्यंबकेश्वरीच करावा असे दालभ्य संहितेत संगितले आहे. नारायण बली व नागबली हेदोन्ही विधी स्वतंत्र आहेत. अनपत्यता दूर व्हावी म्हणून हे दोन्ही विधी बरोबरच करावे असे शास्त्रवचन आहे. म्हणजे कोणत्याहि अदृश्य कारणांनी निर्माण होणारी अनपत्यता, दुर्धर शरीरपीडा, संतति विच्छेद वगैरे दुःखे नाहीशी होतात. कधी कधी आपल्या पत्रिकेप्रमाणे नागहत्या हा एकच दोष निश्चित असल्यास, हा एकच विधी स्वतंत्र करतात. य विधीकरता अमावस्या, पौर्णिमा, पंचमी व अश्लेषा नक्षत्रासह नवमी हे मुहूर्त घ्यावेत. त्यातहि श्रावण शुद्ध पंचमी व मार्गशीर्ष शुद्ध पंचमी हे दिवस फारच उत्तम सांगितले आहेत. या दोन्ही पंचमीना नागपंचमी अशी संज्ञा आहे, जनमेजय राजाने केलेले सर्पसत्र हे याच पंचमीला अस्तिक ऋषींनी थांबविले. त्यामुळे नागजातीस अतिशय समाधान झाले.

मुहुर्त विचार

नागबली या विधीस नक्षत्रदोष पहावा लागत नाही. मगे सांगितल्याप्रमाणे याजन्मी यामागील जन्मी नागवध केला सएल किंवा वधास सहाय्य केले असेल तर त्या पापाने संततीस प्रतिबंध होतो. तो दूर व्हावा म्हणून हा विधी करतात.

तिसरा दिवस

तिसरे दिवशी सकाळी, ज्या ठिकाणी नागाचे दहन केले होते, त्या तेथील रक्षा भरून गंगेत टाकून. त्या जागेवर दूध, तुप शिंपडून घरी आल्यानंतर उभयातांनी शुद्ध स्नान करावे. स्नानानंतर अशीच संपते. नंतर घरी पुण्याहवाचन करावयाचे. सुवर्णाची नागप्रतिमा आपले शक्तीप्रमाणे प्रत्येकाने करावी. सुवर्णनाग मूर्तीपूजन विध _ ( शास्त्रात ८० गुंजा वजन असावे असे सांगते. ) त्या नागप्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करुन शोडषोपचारे त्या नागमुर्तीचे पुजन करावे. नंतर त्या मूर्तीचे विसर्जन करून ती नवी मूर्ती उपाध्यास दान करावयाची. ज्यांचे आई-वडील परलोकवासी झाले असतील त्यांनी तीर्थश्राद्ध करावे व या दोन्ही विधी निमित्त ब्राह्मण भोजन घालावे. कमीत कमी ८ ब्राह्मण घालतात. उत्तम पक्ष२१ व मध्यम पक्ष १२ ब्राह्मणास भोजन द्यावे. याप्रमाणे ब्राह्मण भोजन झाल्यानंतर हा नारायण नागबली पूर्ण होतोत हे पैतृक कर्म असल्याने, दैविक कर्म करणे जरूर असते. हा विधी करण्याकरिता सर्व भारतातून दरसाल हजारो लोक येतात.

नारायण नागबली का करावे ?

पुष्कळशा लोकांचे मनोरथ पूर्ण झाल्याने दाखले येथे पहावयास मिळतात. तसेच पैशाचादिक बाधा असल्यास ती दूर होते. क्वचित द्रव्यलोभास्तव त्यावर असलेल्या नागाची हत्या केली असल्यास, तो नाग त्या माणसाचे अंगात येऊन मुक्ति घेतो अशी उदाहरणे पहावयास मिळतात. ज्याला विवाह झाल्यानंतर १५-२० वर्षात संतति झाली नाही अशा दांपत्याना संतति प्राप्तिसाठी हा विधी केल्यानंतर संतति झाल्याची पुष्कळ उदाहरणे आहेत. ज्यांना फक्त कन्या संततीच होत आहे. परंतु पुत्रप्राप्ती होत नाही अशांना हा विधी केल्यानंतर, पुत्रप्राप्ती झाल्याची उदाहरणे आहेत. ज्यांची संतती होऊन वाचत नाही, तसेच असणाऱ्या संततीस आरोग्य लाभत नाही त्या सर्वांना या विधीचा उपयोग झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत.

नारायणबलीला देणगी

१) रुद्रश्राद्ध - २१ ब्राह्मणास भोजन व २२ बैल, २) विष्णूतर्पण सांगता ( पयस्विनी गाय ), ३) पंचदेवता स्थापनेकरिता - (पांच कलश, पांच ताम्हणे, पांच मूर्ती), ४) विष्णूश्राद्ध - (गोदान), ५) पंच देवताश्राद्ध (भूमिदान, कपिला गाय, बैल, महिष, तेरा मण तील पर्वत), ६) एकादशाहश्राद्ध (वृषोत्सर्ग गोप्रदान), ७) महिकोंदिष्ट श्राद्ध (पापक्षालनार्थ धेनू, ऋणधेनू, वैतरणा धेनू अष्टविध पददान, दशदाने), ८) षोडश श्राद्ध ( अन्न, उदक, दीप), ९) सपिंडी श्राद्ध ( मोक्षधेनू, वस्त्र, दक्षिणा), १०) पाथेयश्राद्ध ( छत्र, कमंडलू, उपानह, कंबल )

नागबलीकरिता देणगी

कपिला धेनू, अन्नदान, सुवर्णनागप्रतिमा

नारायण नागबलीस लागणारी उपकरणी व साहित्य

धोतरजोडी कोरी, एक पांढरे पातळ नऊवारी, पांढरे कापडाची चोळी, आपले शक्तिप्रमाणे सोन्याची नागप्रतिमा, धोतर व पातळ सचैल वस्त्राकरिता ( ज्या वस्त्रावर उभयतांनी स्नान करावयाचे ते पुन्हा नेसावयाचे नसते. )

खालील सर्व सामानाची व्यवस्था उपाध्याय करतात

चरुपात्र, पाच कलश, पांच तबकड्या, तांब्या, भांडे, पळी, तीन ताम्हने, पांच गोमुख्या, पांच धोतरे, पांच आसने, चार देवतांच्या मूर्ती, ( सुवर्ण, ताम्र, रजत, लोह) होमाकरिता तुप, तांदूळ एक शेर, पळसाच्या काड्या, समिधा, शुभा (गोवऱ्या) पंचवीस, तीळ, जव, फुले, पुष्पमाला पंचामृतयुक्त पूजेचे सामान , सुगड, स्वयंपाकरिता साहित्य, जानवी दोन, द्रोण दहा, पत्रावळी दहा, दर्भ, कणीक एक शेर, सर्वीषधी सामान.